श्री गोदड महाराज

शनिवार, 25 फ़रवरी 2012

कर्जतचे हिरे माणिक मोती


कर्जत हा दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक अडचणीवर मत करून तालुक्यातील अनेक हिरे, अनेक माणिक व अनेक मोती आज महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी चमकत आहेत. आपल्या कार्यकर्तृत्त्वाने आपले, आपल्या कुटुंबाचे, आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव रोशन करत आहेत. या सर्व तालुक्यातील हिरे, माणिक, मोत्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्वाची माहिती इतरांना व्हावी या साठी तालुक्याचे वतीने केलेला हा प्रयत्न आहे. या ब्लॉग वर कर्जत तालुक्यातून बाहेर जावून नाव, पद, पैसा, यश, कीर्ती, पुरस्कार, मिळवणारे सर्व हिरे, माणिक, मोती, चमकवनार आहोत. ज्या मुळे तालुक्याच्या खाणीतील हिरे, माणिक, मोती, यांना चांगले पैलू पडणार आहेत. 

शुक्रवार, 24 फ़रवरी 2012

श्री गोदड महाराज कर्जत

अनेक अशा विभूति असतात की ज्यांचे मोठेपण सर्वांना माहित नसते , कारण आपण मोठे आहोत हे त्या विभूति माहित होउही देत नसतात .त्यांच्या पश्चात् भक्तच त्यांचे मोठेपण जगापर्यंत पोहोचवत असतात , अशाच काही विभुतिपैकी सद्गुरु गोदड महाराज एक होत, त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी घेउन कर्जत तालुक्याला अध्यात्मिक दृष्टया पावन केले याची प्रचिती मंदिरात त्यांच्या दर्शनाला गेल्यावर संवेदनशील मनाला झाल्याशिवाय रहाणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथील श्री. गोदड महाराज यांचा जन्मा शके १६८१ श्रावण शुद्ध दशमी , गुरुवारी झाला महाराजांचे जन्मनाव "अमरसिंह" होते
ते स्वभावाने विरक्त , निर्भय अणि शीघ्रकोपी होते ,वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील पराक्रमी राजवंशातिल होते तर आई चंद्रभागा ही कर्जत येथील तोरडमल कुटुम्बातिल होती. अमरसिंह वयाने सहा सात वर्षाचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली , मला विट्ठालानेच मुक्त केले असे त्यांना वाटले दगडाचेच टाल करून ते विट्ठल नाम गाऊ लागले, त्याचवेली विट्ठलभक्ति हाच ध्यास त्यांना लागला होता , एके दिवशी अमरसिंह फिरता फिरता त्यांची भेट पैठण चे संत एकनाथ महाराज यांचे शिष्य परंपरेतील शिष्य " नारायणनाथ " यांच्याशी झाली . त्यांनी अमरसिहाला आनंद साम्प्रदयाची दीक्षा दिली व आपल्या जवळची गोधडी अमरसिहाच्या अंगावर टाकुन सांगितले की आता यापुढे तुजे नाव "गोदडनाथ " (गोदड महाराज).तू यापुढे सातपुडा पर्वतावर जाउन तपश्चर्या करावी तेथेच तुला विट्ठालाचे दर्शन होइल असा आशीर्वाद दिला , त्यानंतर त्यांनी कठोर साधना केली त्यामुले त्यांना विट्ठल रुक्मिनिने दर्शन दिले . त्याच वेळी सातपुडा पर्वतावरील वज्रेश्वरी देवीनेही त्यांना दर्शन दिले व आशीर्वाद दिला .
विविध ठिकाणी भ्रमंती नंतर गोदड महाराज यांची दिंडी पंढरपुर येथे गेली असता तेथे ते भजन किर्तानांत रंगले , त्यावेळी एक ऊच्चकुलीन स्त्री चंद्रभागा नदीवर पाणी भरण्यासाठी घागर घेउन आली असता तिचा पाय महाराजांच्या तम्बुच्या दोरीला अडकून ती पडली त्यामुले ती चिडून गोदड महाराजांना बोलली , हे त्यांना सहन झाले नाही व त्यांनी आपले सर्व साहित्य , रथ , पताका , तम्बू इत्यादि चन्द्रभागेच्या वाळवंट या ठिकाणी अग्नीत पेटून दिले व या आत्मक्लेशामुले स्वतः देहात्यागाची तयारी केली त्या अग्निमधे उडी टाकणार इतक्यात त्या गर्दीतून वाट काढीत प्रत्यक्ष पांडुरंग ब्राह्मणवेशात आले व गोदड महाराजांना म्हणाले आपण आपल्या जन्मगावी कर्नग्राम ( कर्जत) येथे जाउन संजीवन समाधी घ्यावी, आषाढ़ कृष्ण एकादशीस प्रतिवर्षी रथोत्सव साजरा करावा . त्याच दिवशी स्वतः पांडुरंग येउन तुम्हाला भेट देइल असे सांगुन तो ब्राह्मण वेषातील पांडुरंग गुप्त झाला , दरम्यान विविध ठिकाणी भ्रमंतिनंतर महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत गावी म्हणजेच स्वताच्या आजोळी एक पत्र देऊन तेथील पाट्लास असे लिहिले की कर्जत ही आमची जन्मभूमि आहे जर आपली इच्छा असेल तर आम्ही तेथे येऊ . ते पत्र पाहून कर्जतचे तोरडमल पाटिल यांना अत्यंत आनंद झाला . त्यांनी महाराजांचे वास्तव्य असलेल्या फलटन या गावावरून मोठ्या प्रेरणेने कर्जत येथे आणले कर्जत येथे गोदड महाराज चांगलेच रमले . त्यांनी लोक कल्याणार्थ "योगसिध्धांत " ,"जगतारक", "संतविजय", "योगनिर्माण", "गोदड रामायण" इत्यादि ग्रंथांची रचना केली . एके दिवशी महासाध्वी उमाबाई शिम्पिनिच्या हस्ते दूध प्राशन करून शके १७५९ माघ कृष्ण चतुर्थी मंगलवार रोजी माधान्य समई कर्जत येथे संजीवन समाधी घेतली . ज्या जागी सद्गुरु गोदड महाराज तपश्चर्येस बसायचे त्याच जागी त्यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे . महाराजांनी आपला अवतार संपवला असला तरी आजही ग्रंथांच्या रुपाने त्यांचे कार्य सुरूच आहे .सालाबाद प्रमाणे सद्गुरु गोदड महाराजांच्या पुन्यतिथिनिम्मित कर्जत येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो


कर्जत  येथे महाराजाच्या रथयात्रेतकाढण्यात येणारा भव्य रथ 

श्री जगदंबा देवी राशीन

श्री जगदंबा देवी राशीन
अहमदनगर जिलहयातील कर्जत तालुक्यातील राशीन हे गाव आहे. राशीन या गावाची लोकसंख्या सुमारे ४०,००० ते ४५,००० पर्यत आहे. या गावात ग्रामपंचायत आहे. गाव तसे खेडेगावच. या गावाचे मानवि इतिहासाचे कालखंड पाहिलेले आहे असे दिसते. गावाच्या रचनेच्या दृष्टिने स्थुलमानाने त्याचे दोन भाग पाडता येतिल.


पहिला भाग पशचिमेकडील आणि दुसरा भाग दक्षिणेकडिल. पुर्वेकडिल हा भाग पश्चिमेकडिल भागाच्या तुलनेने बराच नवा वाटतो. पश्चिमेकडिल भागात जुन्या गोठयाचे व बुरुजांचे अवशेष अढळतात.यावरुन राशीन गावाची सर्वात जुनि वास्तु आहे हे सिदध होते.सुदैवाने राशीनच्या इतिहासाचा मागोवा घेताना केवळ तिथे विखुरलेल्या प्राचीन अवशेषांच्या कालानुक्रमावारच विसंबुन राहावे लागत नाही.इतिहासाच्या ब-याच कालखंडातील अधिक्रुत पुरावे राशीन येथे किंवा इतरत्र उपलब्ध झालेले आहेत. पुरातन काळातील राशीनच्या इतिहासाचे सर्वात जुने अधिक्रुत पुरावे म्हणजे इ.स.७०० मधील विनयादित्य चालुक्य आणि इ.स.८०७ मधील राष्ट्रकुट गोविंद तिसरा याचे ताम्रपट‌ होते. प्रस्तुत ताम्रपटात राशीनचा "भुक्ती" असा उल्लेख करण्यात आला आहे.यावरुन इ.स.च्या सातव्या शतकापासुन किंबहुना त्याही पुर्वी पासुन दक्षिण भारताच्या राजकिय इतिहासात राशीनला थोडे का होईना निश्चित स्थान‌ निर्मान होते. सातव्या शतकात "भुक्ती" बनण्याच्या प्रतिष्ठेस प्राप्त झालेले राशीनचे इतिहासाविषयी इ.स.सातशेच्या पुर्वीचा पुरावा उपलब्ध नसला तरी इ.स.च्या पाच शतकात बसले असावे असे दिसते.या पुर्वीचे अवशेष येथे सापडत नाहीत. इ.स.पुर्वीची दोन आणि नंतरची दोन शतके या काळचा द‌क्षिणेच्या इतिहास‌च्या संस्क्रुतीने भ‌र‌लेला होता व‌ ज्या संस्कुतीचे भ‌र‌पुर‌ अव‌शेष‌ आज‌ही म‌हाराष्ट्रात‌ साप‌ड‌तात‌. त्या शालीवाह‌न‌ संस्कुतीतील‌ अव‌शेष‌ राशीन‌ येथे आढ‌ळ‌त‌ नाहीत‌. याव‌रून‌ यानंत‌र‌च‌ राशीन‌ गांव‌ व‌स‌लेले असावे असे वाट‌ते. सात‌ वाह‌न‌ राज‌वंशानंत‌र‌ जो ब‌लाढ्य‌ राज‌वंश‌ द‌क्षिणेस‌ झाला त्या ब‌हाम‌नी चालुक्याच्या काळात‌ राशीन‌ला "भुक्ती" म्ह‌णुन‌ ओळ‌खले जाण्याइत‌के म‌ह‌त्व‌ प्राप्त‌ झाले. या काळानंतर मात्र राशीनचाच प्रत्यक्ष उल्लेख फारसा सापडत नाही पण निदान यादवांच्या अस्तापर्यंत तरी राशीनचे पुर्वीचे स्थान कायम असावे असे ग्रुहीत धरण्यास हरकत नाही. त्यानंतरच्या बहामनी आणि निजामशाही काळात राशीनचा मात्र उल्लेख कुठेही आढळत नाही. इतिहासाच्या पाठीवर राशीनचा पुन्हा जो प्रवेश होता तो निजामशाहीच्या अस्तानंतर व दक्षिणेत मोगलांचा पुर्ण अंमल बसला त्यावेळी. नव्या राशीन येथील‌ पाटीलकी भोसले घराण्याकडे होती. हे भोसले श्री छत्रपती शिवाजीराजे यांचे चुलत बंधु शरीफजी भोसल्यांचे वंशज आहेत. शरीफजी आणि त्यांचामुलगा त्र्यंबकजी हे औरंगजेबांच्या चाकरीत असताना औरंगजेबाने त्यांना भिवथडीकडे रवानगी केले तेव्हापासुन हे घराणे येथेच स्थायिक झाले. देवळाच्या उत्तरेकडील तीन समाध्या आहेत. त्या शरीफजी, त्रिंबकजी आणि त्यांच्या पत्नीच्या आहेत. असे सांगण्यात येते. औरंगजेबाने राशीन जवळ औरंगपुर नावाची पेठ बसविण्याचे हुकुम दिला. देवीच्या मंदिरासभोवतालचा भाग आज ज्याला मंगळवार पेठ म्हणुन ओळखला जातो ही जुनी औरंगपुर पेठ आहे. असेही सांगण्यात येते.इ.स.१७५८ अहमदनगर किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला त्या कविजंग सरदाराचे राशीन हे जहागिरीचे गांव होय. त्यानंतर अहमदनगर आणि राशीन सह आसपासचा परीसर मराठ्यांच्या ताब्यात गेला. यापुढील काळातील बरयाच घडामोडीचे अधिक्रुत पुरावे आजही राशीन येथे सापडतात‌. त्याचा प‌राम‌र्श‌ घेऊ या. राशीन‌च्या प्रसिध्दीचे दुस‌रे एक‌ कार‌ण‌ म्ह‌ण‌जे रेणुका देवीचे मंदिर‌ होय‌. माहुर‌च्या रेणुका देवीचे ते ठाणे अस‌ल्याने आसमंतातील‌ ब‌रेच‌ भाविक‌ लोक‌ नेह‌मी द‌र्श‌नासाठी येत‌ अस‌तात‌. देवीचे देवाल‌य‌ गावाच्या द‌क्षिणेस‌ आहे. मुळ‌ मंदिराभोव‌ती चार‌ही बाजुंना ओव‌र‌या असुन‌ स‌मोर‌ भ‌व्य‌ दिप‌स्तंभ‌ मालिका आहेत‌.प्रवेश‌द्वाराबाहेरील‌ चार‌ही बाजुंना ओव‌र‌या अस‌लेले चौक‌ आहेत‌. देवीचे मंदिर‌ जुने असुन‌ त्यांच्या भोव‌ताल‌च्या ओव‌र‌या व‌ प्रवेश‌ द्वार‌ २०० ते २५० व‌र्षापुर्वी बांध‌लेले आहेत‌. हे त्यांच्या र‌च‌नेव‌रुन‌ व‌ त्याव‌र‌ कोर‌लेल्या शिलालेखाच्या पुराव्याव‌रुन‌ स्प‌ष्ट‌ होते.पेश‌वाईतील‌ प्रसिध्द‌ मुत्स‌द्दी अंताजी मान‌केश्व‌र‌ यांचीही देवी कुल‌स्वामिनी होय‌. देवीच्या क्रुपेनेच‌ संत‌ अंताजींनी किर्ती आणि वैभ‌व‌ प्राप्त‌ झाले आणि त्यांची क्रुत‌न्याता म्ह‌णुन‌च‌ त्यांनी म‍ंदिराच्या प‌श्चिमेक‌डील‌ ओव‌र‌या बांध‌ल्या असे सांग‌ण्यात‌ येते. या ओव‌र‌या नंत‌र‌ एक‌ म‌राठी व‌ एक‌ स‍ंस्कुत‌ असे दोन‌ शिलालेख‌ आहेत‌. या दोन्ही लेखांत‌ अंताजी माण‌केश्व‌रांचे नाव‌ आहे. प‌हिल्या ओव‌र‌या बांध‌ल्याचा व‌ दुस‌र‌या दोन‌ दिल्याचा उल्लेख‌ आहे. याव‌रून‌ प‌श्चिमेक‌डील‌ ओव‌र‌या अंताजी माण‌केश्व‌रांनी बांध‌ल्या आहेत‌ हे सिध्द‌ होते. मंदिराच्या द‌क्षिणेक‌डीलही ओव‌र‌याही अंताजीच्या पुर्व‌जांनीच‌ बांध‌लेल्या आहेत‌. असे येथील‌ एक‌ सेवा निव्रुत्त‌ शिक्ष‌क‌ श्री म‌.ना.रेणुक‌र‌ यांनी सांगित‌ले. या ओव‌र‌यांव‌र‌ही शिलालेख‌ आहेत‌. प‌ण‌ द‌ग‌डाच्या ठिसुळ‌प‌णामुळे ते वाच‌ता येत‌ नाहीत‌. त्याव‌रील‌ म‌ज‌कुर‌ श्री रेणुक‌र‌ यांनी २० व‌र्षापुर्वी वाच‌ला होता. सुपे येथील‌ गंधे कुल‌क‌र्णी यांनी श‌के १६६० म‌ध्ये त्या ओव‌र‌या बांध‌ल्या असा उल्लेख‌ होता. असे श्री रेणुक‌र‌ यांचे क‌डुन‌ स‌म‌ज‌ले.याशिवाय बाकीच्या सर्व बांधकाम राशीन येथील शेटे घराण्यातील व्यक्तींनी केलेले आहे. प्रत्यक्ष शिलालेखच त्याची साक्ष देतात. हे घराणे राशीनला कसे आले आणि त्यांनी तेथे कशाप्रकारे निरनिराळी मंदिरे बांधली याबद्दल बरयाच अख्यायिका आहेत. पण बराच शोध करूनही याघ‌राण्या विष‌यीचा इतिहास‌ व‌ काग‌द‌प‌त्रे उप‌ल‌ब्ध‌ नाहीत‌. असे सांग‌ण्यात‌ येते की, शेटे घ‌राण्याचा मुळ‌ पुरूष‌ भुजंगा शेटे हे मीठाचा आणि क‌र‌डईचा व्यापार‌ क‌रीत असे. इक‌डील‌ साग‌री प्रांतात‌ क‌र‌डई न्याय‌ची व‌ तिक‌डील‌ मीठ‌ इक‌डे आणाय‌चे असा त्यांचा व्यापार‌ असे. एक‌दा राशीन‌ला त्यांचा मुक्काम‌ अस‌तांना देवीची सेवा क‌र‌ण्याचा त्यांना द्रुष्टांत‌ झाला,आणि त्यानुसार‌ ते येथे स्थायिक‌ झाले. लिंगाय‌ती पंथी अस‌ल्याने त्यांची तेथे म‌हादेवाचे मंदिर‌ व‌ एक‌ बार‌व‌ बांध‌ले आज‌ही या वास्तु उत्त‌म‌ स्थितीत‌ आहेत‌. म‌हादेवाच्या मंदिराव‌र‌ शिलालेख‌ असुन‌ त्याव‌र‌ भुजंगाच्या यांचेच‌ नांव‌ आहे. या भुजंगाच्या महादाप्पा, विशप्पा, आकप्पा व राजप्पा अशी चार मुले होती. पैकी महादेवप्पा यांनी शके १७०४ मध्ये मंदिराचे महाद्वार, बाजुची भिंत बांधल्या. उत्तरेकडील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे या घराण्यातील निरनिराळ्या व्यक्तींनी देवीच्या मंदिराचे बांधकाम पुर्ण केले.महादप्पाचे धाकटे बंदु व भुजंगाप्पा यांचे त्रुतीय चिरंजीव आकप्पा शेटे यांनी शके १७३१ मध्ये विष्णुचे देवालय बांधले. त्यावरही शिलालेख आहेत.आपल्या गगनचुंबी शिखरांनी व प्रशस्त प्रकारांनी जी तीन मंदिरे राशीनची शोभा वाढवित आहेत ती सर्व शेटे घराण्यातील पुरूषांनी उभी केले आहेत.या शेट्यांची दोन घरे राशीनला आहेत आणि त्यांची सांपत्तिक स्थितीही हालाखीची आहे. त्यांच्या पुर्वजांनी ही मंदिरे कशी बांधली या विषयी बरयाच‌ दंतकथा आहेत. असे सांगतात की, या घराण्यातील पुरूषांवर देवीची क्रुपा झाल्यामुळे त्यांनी कोणतीही वस्तु कपाळाला लावली की तिचे सोने व्हायचे आणि या शक्तीच्या बळावर त्यांनीमंदिरे बांधली. पेशवे देखील हा चमत्कार पाहुन थक्क झाले होते. परंतु ही दंत कथा आहे. हल्लीच्या शेट्यांची स्थिती जरी सर्वसाधारण असली तरी त्यांचा चौक असलेला वाडा गत वैभवाची साक्ष देतो. त्यांच्या पुर्वजांविषयी बरयाच अख्यायिका प्रचलित आहेत. एवढे मात्र खरे की, मंदिराची उभारणीकरून शेटे मंडळींनी राशीनच्या धार्मिक आणि सांस्क्रुतिक इतिहासात मौलिक भर घातली आहे.