श्री गोदड महाराज

गुरुवार, 23 फ़रवरी 2012

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

रेहेकुरी अभयारण्य
रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अभयारण्य आहे. आकारमानाने अतिशय लहान (२.५ चौ.किमी)असून खास काळवीट हरीणांच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य घोषीत केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते.खैरहिवर,शीसव,बाभळीचंदनबेरकरवंदे घायपात येथील काही प्रमुख वनस्पती आहेत. अभयारण्याचा बहुतांशी भाग गवताळ आहे जे येथील हरीणांसाठी अन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.
येथील प्राणी जीवनात वर नमूद केल्याप्रमाणे काळवीटांची संख्य लाक्षणीय आहे. येथे अभयारण्य घोषीत केल्यापासून काळवीटांची संख्या प्रामुख्याने वाढली [१]. काळवीटांसोबत चिंकाराही येथे आढळून येतो. खोकड तसेच लांडग्याचेही अस्तित्व आहे. पक्ष्यामध्ये मोर , शिक्रा येथे आढळून येतात
काळवीटांची संख्या वाढल्याने व अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने साहजिकच अभयारण्याचा आकार काळवीटांसाठी कमी पडत आहे दरवर्षी काळवीटांकडून आजूबाजूची शेतांमधील अन्नाची नासधूस करण्याचे प्रकार घडतात[२].
रेहेकुरी हे भेट देण्यासाठी अतिशय उत्तम अभयारण्य आहे. दौंडहून ६० किमी अंतरावर कर्जत (अहमदनगर जिल्हा) येथे यावे.दौंड किंवा अहमदनगरहून कर्जत येथे जाण्यासाठी राज्यपरिवाहन मंडळाच्या बसेस आहेत. कर्जतहून केवळ ४ - ५ किमीवर रेहेकुरी अभयारण्य आहे. वनविभागाचे विश्रामगृह असून तेथे रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच मोठ्या गटांसाठी तंबूचीही व्यवस्थ होऊ शकते. (जेवण खाण्याची व्यवस्था ग्रुपने स्वता: केल्यास उत्तम) काळवीट व चिंकारा येथे हमखास दिसतात लहान मुलांना वन्यप्राण्यांचा अनुभव देण्यासाठी उत्तम जागा आहे. सिद्धटेक येथील गणपतीव राशीन येथील देवीचे मंदिर येथील इतर आकर्षणे आहेत



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें