अनेक अशा विभूति असतात की ज्यांचे मोठेपण सर्वांना माहित नसते , कारण आपण मोठे आहोत हे त्या विभूति माहित होउही देत नसतात .त्यांच्या पश्चात् भक्तच त्यांचे मोठेपण जगापर्यंत पोहोचवत असतात , अशाच काही विभुतिपैकी सद्गुरु गोदड महाराज एक होत, त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी घेउन कर्जत तालुक्याला अध्यात्मिक दृष्टया पावन केले याची प्रचिती मंदिरात त्यांच्या दर्शनाला गेल्यावर संवेदनशील मनाला झाल्याशिवाय रहाणार नाही.
|
ते स्वभावाने विरक्त , निर्भय अणि शीघ्रकोपी होते ,वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील पराक्रमी राजवंशातिल होते तर आई चंद्रभागा ही कर्जत येथील तोरडमल कुटुम्बातिल होती. अमरसिंह वयाने सहा सात वर्षाचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली , मला विट्ठालानेच मुक्त केले असे त्यांना वाटले दगडाचेच टाल करून ते विट्ठल नाम गाऊ लागले, त्याचवेली विट्ठलभक्ति हाच ध्यास त्यांना लागला होता , एके दिवशी अमरसिंह फिरता फिरता त्यांची भेट पैठण चे संत एकनाथ महाराज यांचे शिष्य परंपरेतील शिष्य " नारायणनाथ " यांच्याशी झाली . त्यांनी अमरसिहाला आनंद साम्प्रदयाची दीक्षा दिली व आपल्या जवळची गोधडी अमरसिहाच्या अंगावर टाकुन सांगितले की आता यापुढे तुजे नाव "गोदडनाथ " (गोदड महाराज).तू यापुढे सातपुडा पर्वतावर जाउन तपश्चर्या करावी तेथेच तुला विट्ठालाचे दर्शन होइल असा आशीर्वाद दिला , त्यानंतर त्यांनी कठोर साधना केली त्यामुले त्यांना विट्ठल रुक्मिनिने दर्शन दिले . त्याच वेळी सातपुडा पर्वतावरील वज्रेश्वरी देवीनेही त्यांना दर्शन दिले व आशीर्वाद दिला .
विविध ठिकाणी भ्रमंती नंतर गोदड महाराज यांची दिंडी पंढरपुर येथे गेली असता तेथे ते भजन किर्तानांत रंगले , त्यावेळी एक ऊच्चकुलीन स्त्री चंद्रभागा नदीवर पाणी भरण्यासाठी घागर घेउन आली असता तिचा पाय महाराजांच्या तम्बुच्या दोरीला अडकून ती पडली त्यामुले ती चिडून गोदड महाराजांना बोलली , हे त्यांना सहन झाले नाही व त्यांनी आपले सर्व साहित्य , रथ , पताका , तम्बू इत्यादि चन्द्रभागेच्या वाळवंट या ठिकाणी अग्नीत पेटून दिले व या आत्मक्लेशामुले स्वतः देहात्यागाची तयारी केली त्या अग्निमधे उडी टाकणार इतक्यात त्या गर्दीतून वाट काढीत प्रत्यक्ष पांडुरंग ब्राह्मणवेशात आले व गोदड महाराजांना म्हणाले आपण आपल्या जन्मगावी कर्नग्राम ( कर्जत) येथे जाउन संजीवन समाधी घ्यावी, आषाढ़ कृष्ण एकादशीस प्रतिवर्षी रथोत्सव साजरा करावा . त्याच दिवशी स्वतः पांडुरंग येउन तुम्हाला भेट देइल असे सांगुन तो ब्राह्मण वेषातील पांडुरंग गुप्त झाला , दरम्यान विविध ठिकाणी भ्रमंतिनंतर महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत गावी म्हणजेच स्वताच्या आजोळी एक पत्र देऊन तेथील पाट्लास असे लिहिले की कर्जत ही आमची जन्मभूमि आहे जर आपली इच्छा असेल तर आम्ही तेथे येऊ . ते पत्र पाहून कर्जतचे तोरडमल पाटिल यांना अत्यंत आनंद झाला . त्यांनी महाराजांचे वास्तव्य असलेल्या फलटन या गावावरून मोठ्या प्रेरणेने कर्जत येथे आणले कर्जत येथे गोदड महाराज चांगलेच रमले . त्यांनी लोक कल्याणार्थ "योगसिध्धांत " ,"जगतारक", "संतविजय", "योगनिर्माण", "गोदड रामायण" इत्यादि ग्रंथांची रचना केली . एके दिवशी महासाध्वी उमाबाई शिम्पिनिच्या हस्ते दूध प्राशन करून शके १७५९ माघ कृष्ण चतुर्थी मंगलवार रोजी माधान्य समई कर्जत येथे संजीवन समाधी घेतली . ज्या जागी सद्गुरु गोदड महाराज तपश्चर्येस बसायचे त्याच जागी त्यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे . महाराजांनी आपला अवतार संपवला असला तरी आजही ग्रंथांच्या रुपाने त्यांचे कार्य सुरूच आहे .सालाबाद प्रमाणे सद्गुरु गोदड महाराजांच्या पुन्यतिथिनिम्मित कर्जत येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो
कर्जत येथे महाराजाच्या रथयात्रेतकाढण्यात येणारा भव्य रथ |
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें