श्री गोदड महाराज

गुरुवार, 23 फ़रवरी 2012

कर्जत तालुक्या मधील विशेष

१}श्री सिद्धिविनायक अष्टविनायकातील एक गणपती तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. २}श्री गोदड महाराज यांची संजीवन समाधी कर्जत येथे आहे. ३}राशीन येथे श्री यमाई मातेचे मंदिर आहे या ठिकाणी हलत्या दीपमाळी प्रसिद्ध आहेत ४}कुलधरण येथे देवीचे मंदिर आहे . ५}तालुक्यामध्ये काळवीट अभयारण्य रेह्कुरी येथे आहे. ६}भारतातील एकमेव दुर्योधना चे मंदिर दुर्गाव येथे आहे. ७}तालुक्यातील मादळी येथे मौनधारी श्री आत्माराम बाबा यांचे प्रस्थ वाढत आहे. ८}तालुक्याचे एका बाजूने सीना नदी तर एका बाजूने भीमा नदी वाहते आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत हा तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. या तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था खूप सुंदर आहे. तालुक्याची प्रगती होत असून त्यासाठी सर्वच घटकाचे महत्वाचे योगदान आहे. कर्जत तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यामध्ये राशीन व मिरजगाव ही दोन मोठी बाजारपेठ असलेली गावे आहे राशीन येथील मंगळवारी भरणारा जनावरांचा बाजार तर खूप प्रसिध्द आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें