श्री जगदंबा देवी राशीन
अहमदनगर जिलहयातील कर्जत तालुक्यातील राशीन हे गाव आहे. राशीन या गावाची लोकसंख्या सुमारे ४०,००० ते ४५,००० पर्यत आहे. या गावात ग्रामपंचायत आहे. गाव तसे खेडेगावच. या गावाचे मानवि इतिहासाचे कालखंड पाहिलेले आहे असे दिसते. गावाच्या रचनेच्या दृष्टिने स्थुलमानाने त्याचे दोन भाग पाडता येतिल.
|
पहिला भाग पशचिमेकडील आणि दुसरा भाग दक्षिणेकडिल. पुर्वेकडिल हा भाग पश्चिमेकडिल भागाच्या तुलनेने बराच नवा वाटतो. पश्चिमेकडिल भागात जुन्या गोठयाचे व बुरुजांचे अवशेष अढळतात.यावरुन राशीन गावाची सर्वात जुनि वास्तु आहे हे सिदध होते.सुदैवाने राशीनच्या इतिहासाचा मागोवा घेताना केवळ तिथे विखुरलेल्या प्राचीन अवशेषांच्या कालानुक्रमावारच विसंबुन राहावे लागत नाही.इतिहासाच्या ब-याच कालखंडातील अधिक्रुत पुरावे राशीन येथे किंवा इतरत्र उपलब्ध झालेले आहेत. पुरातन काळातील राशीनच्या इतिहासाचे सर्वात जुने अधिक्रुत पुरावे म्हणजे इ.स.७०० मधील विनयादित्य चालुक्य आणि इ.स.८०७ मधील राष्ट्रकुट गोविंद तिसरा याचे ताम्रपट होते. प्रस्तुत ताम्रपटात राशीनचा "भुक्ती" असा उल्लेख करण्यात आला आहे.यावरुन इ.स.च्या सातव्या शतकापासुन किंबहुना त्याही पुर्वी पासुन दक्षिण भारताच्या राजकिय इतिहासात राशीनला थोडे का होईना निश्चित स्थान निर्मान होते. सातव्या शतकात "भुक्ती" बनण्याच्या प्रतिष्ठेस प्राप्त झालेले राशीनचे इतिहासाविषयी इ.स.सातशेच्या पुर्वीचा पुरावा उपलब्ध नसला तरी इ.स.च्या पाच शतकात बसले असावे असे दिसते.या पुर्वीचे अवशेष येथे सापडत नाहीत. इ.स.पुर्वीची दोन आणि नंतरची दोन शतके या काळचा दक्षिणेच्या इतिहासच्या संस्क्रुतीने भरलेला होता व ज्या संस्कुतीचे भरपुर अवशेष आजही महाराष्ट्रात सापडतात. त्या शालीवाहन संस्कुतीतील अवशेष राशीन येथे आढळत नाहीत. यावरून यानंतरच राशीन गांव वसलेले असावे असे वाटते. सात वाहन राजवंशानंतर जो बलाढ्य राजवंश दक्षिणेस झाला त्या बहामनी चालुक्याच्या काळात राशीनला "भुक्ती" म्हणुन ओळखले जाण्याइतके महत्व प्राप्त झाले. या काळानंतर मात्र राशीनचाच प्रत्यक्ष उल्लेख फारसा सापडत नाही पण निदान यादवांच्या अस्तापर्यंत तरी राशीनचे पुर्वीचे स्थान कायम असावे असे ग्रुहीत धरण्यास हरकत नाही. त्यानंतरच्या बहामनी आणि निजामशाही काळात राशीनचा मात्र उल्लेख कुठेही आढळत नाही. इतिहासाच्या पाठीवर राशीनचा पुन्हा जो प्रवेश होता तो निजामशाहीच्या अस्तानंतर व दक्षिणेत मोगलांचा पुर्ण अंमल बसला त्यावेळी. नव्या राशीन येथील पाटीलकी भोसले घराण्याकडे होती. हे भोसले श्री छत्रपती शिवाजीराजे यांचे चुलत बंधु शरीफजी भोसल्यांचे वंशज आहेत. शरीफजी आणि त्यांचामुलगा त्र्यंबकजी हे औरंगजेबांच्या चाकरीत असताना औरंगजेबाने त्यांना भिवथडीकडे रवानगी केले तेव्हापासुन हे घराणे येथेच स्थायिक झाले. देवळाच्या उत्तरेकडील तीन समाध्या आहेत. त्या शरीफजी, त्रिंबकजी आणि त्यांच्या पत्नीच्या आहेत. असे सांगण्यात येते. औरंगजेबाने राशीन जवळ औरंगपुर नावाची पेठ बसविण्याचे हुकुम दिला. देवीच्या मंदिरासभोवतालचा भाग आज ज्याला मंगळवार पेठ म्हणुन ओळखला जातो ही जुनी औरंगपुर पेठ आहे. असेही सांगण्यात येते.इ.स.१७५८ अहमदनगर किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला त्या कविजंग सरदाराचे राशीन हे जहागिरीचे गांव होय. त्यानंतर अहमदनगर आणि राशीन सह आसपासचा परीसर मराठ्यांच्या ताब्यात गेला. यापुढील काळातील बरयाच घडामोडीचे अधिक्रुत पुरावे आजही राशीन येथे सापडतात. त्याचा परामर्श घेऊ या. राशीनच्या प्रसिध्दीचे दुसरे एक कारण म्हणजे रेणुका देवीचे मंदिर होय. माहुरच्या रेणुका देवीचे ते ठाणे असल्याने आसमंतातील बरेच भाविक लोक नेहमी दर्शनासाठी येत असतात. देवीचे देवालय गावाच्या दक्षिणेस आहे. मुळ मंदिराभोवती चारही बाजुंना ओवरया असुन समोर भव्य दिपस्तंभ मालिका आहेत.प्रवेशद्वाराबाहेरील चारही बाजुंना ओवरया असलेले चौक आहेत. देवीचे मंदिर जुने असुन त्यांच्या भोवतालच्या ओवरया व प्रवेश द्वार २०० ते २५० वर्षापुर्वी बांधलेले आहेत. हे त्यांच्या रचनेवरुन व त्यावर कोरलेल्या शिलालेखाच्या पुराव्यावरुन स्पष्ट होते.पेशवाईतील प्रसिध्द मुत्सद्दी अंताजी मानकेश्वर यांचीही देवी कुलस्वामिनी होय. देवीच्या क्रुपेनेच संत अंताजींनी किर्ती आणि वैभव प्राप्त झाले आणि त्यांची क्रुतन्याता म्हणुनच त्यांनी मंदिराच्या पश्चिमेकडील ओवरया बांधल्या असे सांगण्यात येते. या ओवरया नंतर एक मराठी व एक संस्कुत असे दोन शिलालेख आहेत. या दोन्ही लेखांत अंताजी माणकेश्वरांचे नाव आहे. पहिल्या ओवरया बांधल्याचा व दुसरया दोन दिल्याचा उल्लेख आहे. यावरून पश्चिमेकडील ओवरया अंताजी माणकेश्वरांनी बांधल्या आहेत हे सिध्द होते. मंदिराच्या दक्षिणेकडीलही ओवरयाही अंताजीच्या पुर्वजांनीच बांधलेल्या आहेत. असे येथील एक सेवा निव्रुत्त शिक्षक श्री म.ना.रेणुकर यांनी सांगितले. या ओवरयांवरही शिलालेख आहेत. पण दगडाच्या ठिसुळपणामुळे ते वाचता येत नाहीत. त्यावरील मजकुर श्री रेणुकर यांनी २० वर्षापुर्वी वाचला होता. सुपे येथील गंधे कुलकर्णी यांनी शके १६६० मध्ये त्या ओवरया बांधल्या असा उल्लेख होता. असे श्री रेणुकर यांचे कडुन समजले.याशिवाय बाकीच्या सर्व बांधकाम राशीन येथील शेटे घराण्यातील व्यक्तींनी केलेले आहे. प्रत्यक्ष शिलालेखच त्याची साक्ष देतात. हे घराणे राशीनला कसे आले आणि त्यांनी तेथे कशाप्रकारे निरनिराळी मंदिरे बांधली याबद्दल बरयाच अख्यायिका आहेत. पण बराच शोध करूनही याघराण्या विषयीचा इतिहास व कागदपत्रे उपलब्ध नाहीत. असे सांगण्यात येते की, शेटे घराण्याचा मुळ पुरूष भुजंगा शेटे हे मीठाचा आणि करडईचा व्यापार करीत असे. इकडील सागरी प्रांतात करडई न्यायची व तिकडील मीठ इकडे आणायचे असा त्यांचा व्यापार असे. एकदा राशीनला त्यांचा मुक्काम असतांना देवीची सेवा करण्याचा त्यांना द्रुष्टांत झाला,आणि त्यानुसार ते येथे स्थायिक झाले. लिंगायती पंथी असल्याने त्यांची तेथे महादेवाचे मंदिर व एक बारव बांधले आजही या वास्तु उत्तम स्थितीत आहेत. महादेवाच्या मंदिरावर शिलालेख असुन त्यावर भुजंगाच्या यांचेच नांव आहे. या भुजंगाच्या महादाप्पा, विशप्पा, आकप्पा व राजप्पा अशी चार मुले होती. पैकी महादेवप्पा यांनी शके १७०४ मध्ये मंदिराचे महाद्वार, बाजुची भिंत बांधल्या. उत्तरेकडील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे या घराण्यातील निरनिराळ्या व्यक्तींनी देवीच्या मंदिराचे बांधकाम पुर्ण केले.महादप्पाचे धाकटे बंदु व भुजंगाप्पा यांचे त्रुतीय चिरंजीव आकप्पा शेटे यांनी शके १७३१ मध्ये विष्णुचे देवालय बांधले. त्यावरही शिलालेख आहेत.आपल्या गगनचुंबी शिखरांनी व प्रशस्त प्रकारांनी जी तीन मंदिरे राशीनची शोभा वाढवित आहेत ती सर्व शेटे घराण्यातील पुरूषांनी उभी केले आहेत.या शेट्यांची दोन घरे राशीनला आहेत आणि त्यांची सांपत्तिक स्थितीही हालाखीची आहे. त्यांच्या पुर्वजांनी ही मंदिरे कशी बांधली या विषयी बरयाच दंतकथा आहेत. असे सांगतात की, या घराण्यातील पुरूषांवर देवीची क्रुपा झाल्यामुळे त्यांनी कोणतीही वस्तु कपाळाला लावली की तिचे सोने व्हायचे आणि या शक्तीच्या बळावर त्यांनीमंदिरे बांधली. पेशवे देखील हा चमत्कार पाहुन थक्क झाले होते. परंतु ही दंत कथा आहे. हल्लीच्या शेट्यांची स्थिती जरी सर्वसाधारण असली तरी त्यांचा चौक असलेला वाडा गत वैभवाची साक्ष देतो. त्यांच्या पुर्वजांविषयी बरयाच अख्यायिका प्रचलित आहेत. एवढे मात्र खरे की, मंदिराची उभारणीकरून शेटे मंडळींनी राशीनच्या धार्मिक आणि सांस्क्रुतिक इतिहासात मौलिक भर घातली आहे.
| ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें