कर्जत ही श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पुनीत पदस्पर्शाने पावन झालेली नागरी. धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाणारी. हीच माझी जन्मभूमी हीच माझी कर्मभूमी म्हणूनच हीच माझी मायभूमी. कर्जत हा अहमदनगर जिल्हातील तालुका. सोलापूर पुणे या जिल्हाशेजारील तालुका. या तालुक्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत परंतु त्या कुठे जगासमोर येतच नाहीत. आज इंटरनेटच्या जमान्यात नेटवर तालुक्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर खूप काही हातही लागत नाही म्हणून कर्जत तालुक्याची जास्तीत जास्त माहिती एकच ठिकाणी मिळावी ती सर्वाना उपयोगी पडावी ती दररोज अपडेट व्हावी. या साठी हा ब्लॉग सुरु करण्याची कल्पना सुचली. हा माझा छोटा प्रयत्न आहे या सारखे अनेक जन काम करत ही असतील परंतु आपण सर्व जन एका ठिकाणी येत राहिलोत तर अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात हा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी कर्जत च्या विविध बाबी, माहिती, बातम्या, समस्या, येथे देणार आहे.
आपण काय करू शकता
आपण आपल्या सर्व मित्र मैत्रीण, नातेवाईक, यांना या ब्लॉग बाबत माहिती देवून संपर्क करण्याची विनंती करू शकता.
आपण आपल्याला तालुक्याबद्दल असलेली माहिती या ठिकाणी देवू शकता
आपण आपल्या सुचना, काल्पना, मार्गदर्शन आम्हाला देवू शकता.
या ठिकाणी कोणती माहिती हवी आहे कोणती नसावी हे सांगू शकता
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें